पुणे -शहरात पुन्हा एकदा गवा दिसल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. त्यानंतर आज पुन्हा गवा आल्याने प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची तारांबळ उडाली आहे. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान देखील प्रशासनासमोर आहे.
पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; नागरिकांना गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन - बावधन रानगवा न्यूज
शहरी भागात जंगली प्राणी शिरण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. आज पुन्हा पुण्यातील बावधन येथील जंगलात एक गवा दिसला. प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची तारांबळ उडाली आहे.
गवा
काही दिवसांपूर्वीच आला होता एक गवा -
९ डिसेंबरला रस्ता चुकलेला गवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात दिसून आला. कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला होता. जखमी अवस्थेतील गव्याला वाचवण्यासाठी वनविभागाचे पथक आणि महापालिकेचे पथक तातडीने महात्मा सोसायटीच्या परिसरात पोहोचले होते. त्याला वाचवताना त्याचा मृत्यू झाला होता.
Last Updated : Dec 22, 2020, 12:58 PM IST