पुणे : पुणेकरांची बुद्धिमत्ता आणि पुणेकरांचे ज्ञान कधी काय करतील हे जगाला सुद्धा लवकर कळत नाही. तुम्ही आजपर्यंत महापुरुषांचे पुण्यस्मरण आजी-आजोबांचे पुण्यस्मरण असे सगळे ऐकले असेल परंतू पुण्यामध्ये आता चक्क दुर्दैवी गवा जो मृत्यू पावला (Gaur Second death anniversary ) त्याच्या स्मरणात पुण्यस्मरण आणि शोकसभा आयोजन करण्यात आलेले आहे .
गव्याचा द्वितीय पुण्यस्मरण, संवेदना व्यक्त करण्यासाठी शोकसभेचे आयोजन - Unfortunate death in urban area
पुण्यात गव्याच्या मृत्यू प्रसंगी द्वितीय पुण्यस्मरण साजरा करण्यात येत (Gaur Second death anniversary ) आहे. नागरीवस्तीमध्ये गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे
![गव्याचा द्वितीय पुण्यस्मरण, संवेदना व्यक्त करण्यासाठी शोकसभेचे आयोजन gava death aniversary](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17159577-1039-17159577-1670585537165.jpg)
नागरीवस्तीत मृत्यू : दोन वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूड डेपो भागांमध्ये असणाऱ्या महात्मा फुले सोसायटीमध्ये नागरी वस्तीमध्ये गवा घुसला ( Unfortunate death in urban area ) होता. त्याला पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. वन विभागाला सुद्धा त्या गोव्याचे रेस्क्यू करण्यास अपयश आले. गवा दुर्दैवाने त्या नागरिकांच्या गर्दीने आवाजाने स्वतःच पळत सुटला आणि त्याचा त्यात मृत्यू झाला. पुण्यातील कोथरूड भागातील सचिन धनकुडे या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या शोक भावना आपल्यापुढे व्यक्त करीत आहे असं म्हणत शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कोथरूड पीएमटी डेपो चौक रोड कोथरूड येथे या शोकसभेचे त्याने आयोजन केलेल आहे.
गव्याच्या मृत्यूवर कविता :त्यासाठी एक गाडी बनवण्यात आलेली ( poem on Gaur death ) आहे. त्यावर एक प्रतिकात्मक भव्य दिव्य असा गवा साकारण्यात आलेला आहे. त्याच्या साईडने बॅनर लावलेले आहेत. त्या बॅनरवर त्या गवा विषयाच्या संवेदना व्यक्त केलेले आहेत. अरे गवा तू असा रे कसा, कुत्र्यांच्या झुंडीला पाहून मेला असच कसा जंगली स्वापदनांना न भिनारा तू वाघाच्याही टोळीला धडकनेच रोखणारा, तू अरे पाठमोरी टोळी कुत्र्याची तर होती, मागे वळून शिंगे रोखायची तरी होतीस, स्वतःची ताकद ओळखायची तर होती, अरे गवा तू असा रे कसा साऱ्या कुत्र्याच्या झुंडीला पाहून मेलास कसा. या बॅनर वरती माणसाच्या प्रवृत्तीवर घाला घालण्यात आला. शेवटपर्यंत चुकला नाहीस, एकदाही शिंगे खूपसले नाहीस, ताकतीचा गैरवापर केला नाहीस, गवा होतास पण देवासारखा वागलास, कुत्र्यांना भुंकू दिलेस, पाठीमागे येऊ दिलेस, असेल तर सलग सहा तास पळत राहिलास, प्रश्न पडला असेल दूरदृष्टी नसलेल्या देवाला, कुत्र्यांना बुद्धी आणि वाचा दिली काय कामाला? असे माणसांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पुणे आणि जिथे काय होणे म्हणतात आता पुण्यामध्ये गव्याचे सुद्धा पुण्यस्मरण होते हेच यावरून दिसत आहे.