नाशिक- नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारपेक्षा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून पुराची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, नाशिक शहरामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीची मूर्ती अजूनही पाण्यात बुडालेली आहे. तसेच रामसेतू पूल देखिल पाण्याखाली आहे. पावसाची संततधार जर अशीच सुरू राहिली तर पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकतात.
पावसामुळे आज(सोमवारी) नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या 24 नागरिकांवर पोलिसांनी कलम 144 अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे पूर बघण्याची होणारी गर्दी कमी झाली आहे.