महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 21, 2022, 5:43 PM IST

ETV Bharat / state

Pune Sinhagad Crime News : पुणे सिंहगड परिसरात विवस्त्र करून लूटमार करणारी टोळी जेरबंद

पुण्यातील नवले पुलाजवळ दरोडा घालणाऱ्या टोळीला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले ( Sinhagad Police have Arrested A Gang of Strip Looters ) आहे. एका गाडीचालकाला नवले पुलाजवळ हिंगणे चौकात मारहाण करून विवस्त्र केल्यानंतर ( Gang That Robbed Citizens of Pune Sinhagad Area ) फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले ( Pune Sinhagad Crime News ) आहे.

Gang That Robbed Citizens of Pune Sinhagad Area has been Jailed
पुणे सिंहगड परिसरात विवस्त्र करून लूटमार करणारी टोळी जेरबंद

पुणे : पुणे परिसरातील नवले पुलाजवळील हिंगणे चौकात विवस्त्र करून लूटमार करणाऱ्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली ( Sinhagad Police have Arrested A Gang of Strip Looters ) आहे. याप्रकरणी ( Gang That Robbed Citizens of Pune Sinhagad Area ) विनोद शिवाजी जामदारे वय-३२ वर्षे, रा. जाधवनगर वडगाव, पुणे, रोहीत विकास शिनगारे वय १९, रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे, विशाल विठ्ठल रणदिवे, वय-२२, रा. बार्शी, सोलापूर, गौरव गंगाधर शिंदे, रा.मु.पो. ताड सौदाने, ता. बार्शी, जि. सोलापूर नितीन सुरेश जोगदंड, वय. ३५ वर्षे, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव ( Pune Sinhagad Crime News ) आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे :अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी विनोद शिवाजी जामदारे यांचे विरुद्ध सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे माळवाडी येथे खून, दरोडा, खंडणी यासारखे ०७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर गौरव गंगाधर शिंदे याचे बार्शी पो. ठाणे येथे खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. आणि नितीन सुरेश जोगदंड याचे विरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाणे येथे आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

हिंगणे चौकात फिर्यादीला मारहाण :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची गाडी एका प्रवासी कंपनीला भाडेतत्त्वावर लावलेली आहे. हिंगणे चौकाजवळील "आपना फॉर्मसी" येथून भाडे फिर्यादी पीकअप करण्याकरिता थांबला असता त्याठिकाणी दोन इसमांनी येऊन फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्या दोघांनी गाडीमध्ये फिर्यादीला जबरदस्तीने घुसून गाडी हिंगणे स्मशानभूमीशेजारी नेऊन तेथे त्याचे इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यानी मारहाणदेखील केली. यावर आरोपी थांबले नाहीत, त्यांनी फिर्यादीला विवस्त्र करून फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेला.

या कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल :भारतीय दंडात्मक कलमांंतर्गत ३९५, ३६४ अ, ३८५, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत या आरोपींनी अजून असे कुठे गुन्हे दाखल केले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details