पुणे - पीएमपीमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात त्यांनी आतापर्यंत केलेले 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कृष्णा गव्हाणे (वय -24), आकाश आहिवळे (वय 20), मंगेश उकरंडे (वय 18), सुरज सोनवणे (वय 21) आणि हुकूमसिंग भाटी (वय 47) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीएमपीमध्ये वृद्ध महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; चार लाखांचा मुद्देमाल जप्त - पुण्यातील दागिने चोर
पीएमपीमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात त्यांनी आतापर्यंत केलेले 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसरात पीएमपीमध्ये प्रवासादरम्यान वृद्ध महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. काही तरुण चोरीच्या उद्देशाने पुणे स्थानकावरून पीएमपीमधून प्रवास करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
आरोपी गर्दीच्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढून वृद्ध महिलांच्या अंगावरील दागिने चोरत असत, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे. सदर आरोपींचे आतापर्यंत 14 गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.