पुणे :पुणे पोलीस निरिक्षक रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहराकडील पोलीस पथक हे हद्दीत गस्त करत असताना दोन डिलर नानाश्री लॉजसमोर वाघोली पुणे येथे आल्याची बातमी मिळाली. त्याअनुषंगाने युनिट 6 कडून सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे ज्या गाडीत बसले होते त्या गाडीची झडती घेतली असता गाडीत १ गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत.
गुन्हेगारांची माहिती :या प्रकरणी पोलिसांनी हनुमंत अशोक गोल्हार ( वय २४ वर्षे रा. मु.पो.जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर ), प्रदिप विष्णू गायकवाड ( वय २५ वर्षे रा. मु.पो.ढाकणवाडीता. पाथर्डी जि.अहमदनगर मुळ रा. नगररोड, चहाट फाटा, तालूका जिल्हा बीड ), अरविंद श्रीराम पोटफोडे ( वय ३८ वर्षे, रा. अमरापुरता. शेवगाव जि. अहमदनगर), शुभम विश्वनाथ गरजे श्वर( वय २५ वर्षे रा. मु.पो. बडुले ता.नेवास जि.अहमदनगर), ऋषिकेश सुधाकर वाघ ( वय २५ वर्षे रा. मु.पो. सोनई ता.नेवासा जि.अहमदनगर ), अमोल भाऊसाहेब शिंदे ( वय २५ वर्षे रा. मु.पो.खडले परमानंद ता. नेवासा जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या कारवाई मध्ये युनिट 6 कडून साहिल चांदेरे (२१) याच्याकडून ४ पिस्तूल, ९ जिवंत काडतुसे असा एकूण २,४९,००० रुपयंचा ऐवज जप्त केला आहे.