महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसावरच गुंडांचा हल्ला, पुण्याच्या येरवड्यातील घटना

गुन्हेगार तपासणीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सागर घोरपडे असे पोलीस हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

pune
पोलिसावरच गुंडांचा हल्ला, पुण्याच्या येरवड्यातील घटना

By

Published : Mar 11, 2020, 9:56 AM IST

पुणे - गुन्हेगार तपासणीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सागर घोरपडे असे पोलीस हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे हे गुन्हे शाखा चारचे कर्मचारी आहेत. मंगळवारी साडे आठ वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगाराच्या तपासणीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेले होते. यावेळी त्यांच्यावर गुंडाच्या टोळक्याने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले आहेत.

हेही वाचा -Corona Virus : पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या घोरपडे यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एका हल्लेखोराला अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. जखमी झालेले घोरपडे यांची ओळख वर्दीतील गायक अशी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गायलेलं गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. वरिष्ठांनीही त्यांचे कौतुक केले होते.

हेही वाचा -पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पाचवर

दरम्यान, पोलिसांवरच गुन्हेगारांनी हल्ला केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सराईत गुन्हेगारांची हिंमत इतकी कशामुळे वाढली? त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का? असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details