पुणे -पुण्याचा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. ढोल-ताशा ही पुण्याच्या गणपतीची ओळख. भगव्या पताका, परिधान केलेले केसरी रंगाचे जॅकेट, मुलींच्या नाकातली मराठमोळी नथ आणि तालावर मुलींनी धरलेला ठेका हा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष वेधून घेतो. मराठमोळ्या पोशाखात सहभागी झालेले वादक गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालत असतात. मात्र यंदा कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे हा गणेशोत्सव साध्या पद्वतीने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात ढोल ताशांचा आवाज घुमणार नाही.
यंदाचा गणेशोत्सव ढोल ताशांविनाच.. कोरोनाच्या विळख्यातून भक्तांना सोडवण्याचे बाप्पाला साकडे - Pune latest news
आगमन आणि विसर्जनाच्या सोहळ्यात ढोल ताशांच्या दणदणाटाने येणारी रंगत डोळ्याचं पारण फेडणारी असते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात हे पाहण्याची पुणेकरांची संधी हुकणार आहे. मात्र पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट संपले, की त्याच जोषात आगमनाची तयारी करू. तोपर्यंत यंदाचा गणेशोत्सव आरोग्यदायी साजरा करु, असे या ढोल-ताशा पथकात सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींनी सांगितले.
दरवर्षी मुठा नदीपात्रात जुलै महिन्यात ढोल ताशाचा आवाज घुमू लागला की समजायचं गणेशोत्सव जवळ आलाय. पण यंदा मात्र ढोल ताशांचा आवाज घुमलाच नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ढोल ताशांचा सराव सुरु झालाच नाही. त्यात मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ढोल ताशा प्रेमींच्या आनंदावर मात्र विरजण पडले. कारण दरवर्षी हे ढोल ताशा वादक महिनाभरापासून बेभान होऊन सराव करत बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज होत असतात. यंदा मात्र कोरोनाने त्यांचा हा आनंद हिरावून घेतला.
ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर ढोल ताशाविषयी सांगताना म्हणाले, पुणे जिल्ह्यात एकूण 170 ढोल ताशा पथके आहेत. एका पथकात कमीत कमी 60 ते 600 वादकांचा समावेश असतो. साधारण 25 हजार वादक दरवर्षी मिरवणुकीत सहभागी होतात. प्रत्येक पथकाचं 20 ते 60 हजार रुपयांचं मिरवणुकीचं मानधन असतं. त्यामुळे ढोल-ताशा पथकामुळे चालणारे अर्थकारण ठप्प ठप्प झाले आहे. अर्थात ढोल-ताशा पथकामुळे अर्थकारण होत असले तरी याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. कारण यातून मिळणारे पैसे हे बँड पथकासारखे वादककापर्यंत जात नाहीत. वादक हे स्वतःच्या आनंदासाठी ढोल-ताशा पथकात सहभागी होत असतात. यातून मिळणारे पैसे ढोल-ताशांसाठी वापरले जातात. गणेशोत्सव येऊन सुद्धा ढोल ताशांचा आवाज गणेशभक्तांना ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे अनेकांना चुकल्यासारखं होईल.
आगमन आणि विसर्जनाच्या सोहळ्यात ढोल ताशांच्या दणदणाटाने येणारी रंगत डोळ्याचं पारण फेडणारी असते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात हे पाहण्याची पुणेकरांची संधी हुकणार आहे. मात्र पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट संपले, की त्याच जोषात आगमनाची तयारी करु. तोपर्यंत यंदाचा गणेशोत्सव आरोग्यदायी साजरा करु, असे या ढोल ताशा पथकात सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींनी सांगितले.