पुण्यात गणेशोत्सवाची तयारी पुणेGaneshotsav 2023 in Pune :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटक प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून गणेशोत्सवात 'गणपती तुमचा, किंमतही तुमची' हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. यंदाच्या वर्षी या उपक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चित्र रेखाटलंय. या उपक्रमा अंतर्गत जवळपास 7 हजारहून अधिक गणपती बाप्पाच्या मुर्त्या नागरिकांना त्यांच्या किंमतीत मिळणार आहे. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आहे. नागरिक त्यांच्या किंमतीप्रमाणे या मूर्ती घेऊ शकतात.
3 वर्षापासून उपक्रम सुरू :गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोनानं जगभरात थैमान घातलं होतं. तसंच वाढत असलेल्या महागाईमुळं त्रस्त असलेल्या नागरिकांना देखील आपल्या घरात लाडक्या गणरायाचे आगमन करता यावे, यासाठी प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. दरवर्षी 7 हजार हून अधिक बाप्पाच्या मूर्ती नागरिकांना त्यांच्याच किंमतीत देण्यात (Pune Ganapati Tumcha kimmat Tumchi activity) येतात.
यंदा 7 हजार मूर्ती देण्यात येणार :श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे तत्कालीन अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सुचवलेल्या संकल्पनेनुसार, मी कोरोना काळात या उपक्रमाला सुरवात केली. नागरिकांना पैशाअभावी आपला लाडका बाप्पा घरी बसवता येत नव्हता, ही बाब लक्षात घेता मी छोट्या-मोठ्या मूर्ती आणल्या. नागरिकांना त्या त्यांच्या किंमतीत देण्यास सुरवात केली. याला उत्तम असा प्रतिसाद देखील मिळतोय. यंदा या उपक्रमाचं तिसरे वर्ष आहे. या वर्षी विविध प्रतिकृतीचे 7 हजारहून अधिक बाप्पाच्या मूर्ती या नागरिकांना देण्यात येणार आहे, असं यावेळी मनसे कार्यकर्ते प्रल्हाद गवळी यांनी (Raj Thackeray students Draw Pictures) सांगितलंय.
'मूर्ती तुमची, किंमतही तुमची' : यंदा 7 हजारगणेशमूर्तीउपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती आहेत. नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची आहे. कोविड काळापासून 'मूर्ती तुमची, किंमतही तुमची' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येतंय. उपक्रमाचं यंदा तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हल्ली गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांना या मोठ्या मूर्ती घेणे शक्य होत नाही, पण मोठ्या मूर्ती घेण्याचा मुलांचा हट्ट असतो. यामुळं या उपक्रमामुळे कोणाकडे पैसे नसतील, तर त्यांना विनामूल्य मूर्ती देण्यात येतेय.
हेही वाचा :
- Ganeshotsav On Border: 'किंग ऑफ एलओसी’ मुंबईतून जम्मू काश्मीरकडे रवाना, सीमेवर सैनिक करणार थाटात गणेशोत्सव
- Ganeshotsav 2023: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशांच्या खरेदीची लगबग, पाहा व्हिडिओ
- Ganeshotsav 2023: आला रे आला बाप्पा आला! गणरायाच्या आगमनाचा मुंबईत जल्लोष; 'या' बाप्पांचे आज होणार आगमन