पुणे - देशासह राज्यभरात गणपती विसर्जनाची धूम सुरू आहे. गणेशोत्सव हा फक्त एक उत्सव न राहता सणाच्या रूपात संपूर्ण जगभर साजरा केला जातो. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास येथील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, यावर्षीही विसर्जन मिरवणूक लांबल्याचे चित्र दिसून आले.
गणेश विसर्जन : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला भक्तिभावाने निरोप हेही वाचा -पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच मुख्यमंत्र्यांनी केले गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन
मानाच्या पाच गणपतींचे गुरुवारी विसर्जन झाल्यानंतर रोषणाई आणि आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणुका यंदाही लांबल्या. गुरुवारी मध्यरात्री परत अंत पोळ्यांचा विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या अलका चौकापर्यंत चे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी पुणेकर नागरिक तसेच राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा -कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात; चंद्रकांत पाटलांनी ढोलाच्या तालावर धरला ठेका
विसर्जन मिरवणूक मार्गावर एका पाठोपाठ एक येणारे आकर्षक देखाव्यांचे रंगसंगती फुलांनी सजवलेले भव्य मनोहारी रोषणाई नटलेले बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी वरुणराजाने हजेरी लावत बाप्पाला निरोप दिला येथील गणेश उत्सवात लोकप्रिय असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या बाप्पाचे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अलका टॉकीज चौकात आगमन झाले. त्यानंतर विसर्जनासाठी हा बाप्पा पुढे गेला आणि 8 वाजेच्या दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.