महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता वापरा कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती..! - 'पेपर गणेश मूर्ती'

पर्यावरण संवर्धनासाठी सरकारसोबतच सामान्य नागरिक जागरुक झाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींना नागरिक पसंती देतात. त्यामुळेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पुण्यातील मूर्तिकार तृप्ती दगडे यांनी कागदापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.

आता वापरा कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती..!

By

Published : Aug 25, 2019, 6:11 PM IST

पुणे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील बाजारापेठाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. सुबक, सुंदर आणि वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी पुण्यातील मूर्तिकार तृप्ती दगडे यांनी कागदापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती ११ तासात विरघळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

आता वापरा कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती..!
पर्यावरण संवर्धनासाठी सरकारसोबतच सामान्य नागरिकही जागरुक झाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींना नागरिक पसंती देतात. त्यामुळेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तृप्ती दगडे यांनी या 'पेपर गणेश मूर्ती' तयार केल्याचे सांगितले.पेपर गणेश मूर्ती विषयी जास्त माहिती देताना तृप्ती म्हणाल्या, वापरलेल्या वृत्तपत्रांचा लगदा करून या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. पाण्यात पुर्णपणे विरघळणारी ही मूर्ती वजनालाही अतिशय हलकी आहे. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा या मूर्तीची किंमत थोडी जास्त आहे.काही दिवसांपूर्वी आलेल्या पूरपरिस्थितीनंतर सर्वसामान्य नागरिक जागरूक झाला आहे. आपण निसर्गाला जे देतो, तेच निसर्ग आपल्याला परत देतो, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे थोडी जास्त किंमत देऊनही पेपर गणेश मूर्ती घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.पुण्यातील मंडई येथील झुणका भाकर केंद्राच्या पाठीमागे असलेल्या 'पेपर गणपती' या दुकानात एक ते तीन फुटापर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details