मुंबई : मंगळवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मुंबईत हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लालबाग, गिरगाव, दादर, परळ भागात असलेल्या लालबागचा राजा,चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, जीएसबीचा गणपती बाप्पाचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येत भाविक येत असतात. यामुळे मोठी गर्दी होते या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
२ हजार २४ पोलीस अधिकारी आणि ११ हजार ७२६ पोलीस कर्मचारी गणवेशात आणि साध्या वेशात तैनात करण्यात येणार आहे. याचबरोबर दंगल नियंत्रण पथक, अतिशीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक, क्विक रिस्पॉन्स टीम, सीसीटीव्ही ड्रोन या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त-मुंबईतील सर्व मोठ्या गणेश मंडळांच्या इथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गणेश भक्तांनी गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा आणि सतर्क रहावे. अफवांवर विश्वास ठेऊ नये. सुरक्षेसाठी मुंबईकरांनी चिंता करण्याचं कोणतेही कारण नाही. प्रमुख मंडळामध्ये खूप गर्दी होत असते. प्रमुख मंडळासहित सर्व मंडळाची सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल ५ हजार हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सज्ज आहेत. मुंबई पोलिसांचे २ हजार २४ सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस उपायुक्त आणि ११ हजार ७२६ पोलीस कर्मचारी पुढील १० दिवस जनतेच्या सोयीसाठी आणि बाप्पाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
एसआरपीएफच्या तीन तुकड्या तैनात-सुरक्षा व्यवस्थेत हजारो सैन्यासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. मुंबई पोलीस अधिकारी आणि जवानांसह एसआरपीएफच्या तीन तुकड्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आल्या आहेत. एका तुकडीत सुमारे 1500 शिपाई आहेत. संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलीस दल तैनात करण्यात येणार असून 1500 होमगार्ड कर्मचारी देखील तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांसह CRPF, ATS, श्वानपथक, क्विक रिस्पॉन्स टीम्स देखील सज्ज असतील. जवानांसोबतच संवेदनशील भागात चेहरा ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांसह पाच हजार हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.त्यासोबतच सर्व मोठ्या मंडळांबाहेर सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि अग्निशमन विभागाचे पथक उपस्थित राहणार आहे.
टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशात पोलीस-उत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत टवाळखोरांबरोबर चोरट्यांचीही लगबग वाढते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला पोलीस साध्या गणवेशासह गर्दीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे चुकून तुम्ही पोलिसांच्या हाती लागला तर तुमची काही खैर नाही. महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशात पोलीस गर्दीत असणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे. खास करून दर दिवशी दहा लाखांच्या आसपास भाविकांची गर्दी होणाऱ्या लालबागमध्ये आणि लालबागचा राजा परिसरातील व्यापारांसह घर भाड्याने देणाऱ्यांचे काळाचौकी पोलीस आणि एटीएसमार्फत सर्वे करण्यात आला आहे. भाडेकरू आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इत्यंभूत माहिती पोलिसांनी जमा केली आहे. त्याचप्रमाणे सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून ते १९ ऑक्टोबरपर्यंत उड्डाण क्रियाकल्पांवर मुंबई शहरात पोलिसांनी बंदी आणली आहे.
- अशी असणार यंत्रणा
- 5000 सीसीटीव्ही निगराणी
- 13 हजार पोलीस
- 3 CRPF तुकडी
- 3000 वाहतूक पोलीस कर्मचारी
- 1500 होमगार्ड शिपाई
- हजारो स्वयंसेवक
- वॉच टॉवरवरून देखरेख
वाहतुकीसाठी असे असणार आदेश
- 19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी आणि खासगी बसेससाठी पुढील वाहतूक व्यवस्था असेल. दक्षिण मुंबई कार्यक्षेत्रासाठी - 21, 24, 26 आणि 29 दक्षिण मुंबईतील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी आणि खासगी बसेससाठी रस्त्यावर येण्यावर आणि चालण्यावर पूर्ण बंदी असणार आहे. इतर दिवशी मध्यरात्री १२ ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहने धावू शकतात.
- बृहन्मुंबईच्या कार्यक्षेत्रासाठी (दक्षिण मुंबईच्या अखत्यारीत येणारे क्षेत्र वगळता) सर्व प्रकारची अवजड वाहने आणि खाजगी बसेसच्या प्रवेशावर आणि रस्त्यावर सकाळी 11:00 ते 01:00 वाजेपर्यंत पूर्ण बंदी असेल. . दुसऱ्या दिवशी, 20, 23 आणि 25 सप्टेंबर रोजी, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून या वाहनांना रस्त्यावर येण्यास आणि येण्यास बंदी असेल. 19 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी, मुंबईकडे जाणारी आणि जाणारी सर्व अवजड वाहने आणि खाजगी बसेसना रात्री 08:00 वाजल्यापासून रस्त्यावर प्रवेश करण्यास आणि चालविण्यास मनाई आहे.
- भाजीपाला, दूध, बेकरी उत्पादने, पिण्याचे पाणी, पेट्रोलियम उत्पादने, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमशासकीय वाहने आणि स्कूल बसेस यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना वरील निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
- मुंबईत प्रवेश करणाऱ्या आणि सोडणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या सर्व खासगी बसेस आणि सूट मिळालेल्या वाहनांसह सर्व अवजड वाहने केवळ त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेवर किंवा भाड्याने घेतलेल्या जागेवर किंवा अधिकृत 'पे अँड पार्क स्पेसेस'वर पार्क केल्या जातील. कोणत्याही रस्त्यावर या वाहनांच्या 'ऑन-स्ट्रीट पार्किंग'ला पूर्णपणे बंदी असेल.
- गणेश विसर्जनाच्या दिवशी जे. जे. जंक्शन, भेंडी बाजार जंक्शन, दोन टाकी जंक्शन, मोल देऊळ जंक्शन, नुवाग पंपधान, शिवदास घापसी अंज्ञान, काकडी चौक, बाडीयंवर जंक्शन आणि त्याकडे जाणान्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक काम नसल्यास सदर क्षेत्रात जाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
या भागात नो-पार्किंग असणार
- रामचंद्र भट्ट मार्ग - डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौक (जे. जे. जंक्शन) ते नुवाण जंक्शन
- शिवदास चापसी मार्ग नुरबाग जंक्शन ते महाराणा प्रताप चौक / माझगांव सर्कल (हँकॉक ब्रिज मार्गे). ३) जिनाभाई मुलजी राठोड मार्ग शिवदास चापसी जंक्शन ते काकळीज चौक.
- पी डिमेलो रोड काकळीज चौक ते वाडीबंदर जंक्शन
- जगन्नाथ शंकरशेठ मार्ग नाना चौक ते पंडित पलुस्कर चौकपर्यंत
- पंडित रमाबाई मार्ग : नाना चौक ते आचार्य श्री आनंद सागर सुरीश्वरजी महाराज चौक / विल्सन जंक्शन पर्यंत ३. न्या. सिताराम पाटकर मार्ग :- संगीतकार देवधर चौक (सुखसागर जंक्शन) ते कॅम्प्स कॉर्नर ब्रिजपर्यंत
- ऑगस्ट क्रांती मार्ग नाना चौक ते केम्पस कॉर्नर जंक्शनपर्यंत.
- जावजी दादाजी मार्ग:- वाहदेव सर्कल ते नाना चौकपर्यंत.
- पंडित मदनमोहन मालविया मार्ग (ताडदेव रोड) ताडदेव सर्कल से बत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन) पर्यंत
हेही वाचा-
- Richest Ganpati in Mumbai : काय सांगता! 69 किलो सोनं आणि 336 किलो चांदीची आहे 'या' बाप्पाची मूर्ती
- Ban Ganesha POP Idols : गणपतीच्या पीओपी मूर्तीवर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार