महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधवा महिलेवर बलात्कार करून बेदम मारहाण करणारे फरार आरोपी जेरबंद - pimpri chinchwad city news

पिंपरी-चिंचवडमध्ये मेडिकलमधून औषधे आणण्यासाठी जात असलेल्या 26 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार करून बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती.

accused arrested
आरोपी जेरबंद

By

Published : Jul 28, 2020, 11:57 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये मेडिकलमधून औषधे आणण्यासाठी जात असलेल्या 26 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार करून बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी फरार असलेले मुख्य आरोपी साजन मनरु (26) आणि अनिकेत झंझोटड या दोघांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेला दुचाकीवर बळजबरी बसवून मुंबई-पुणे हायवे लगत या नराधमांनी महिलेवर बलात्कार केला होता.

हेही वाचा -पुण्यात प्रसूतीपूर्वीच बाळाला कोरोनाची लागण; देशातील पहिलीच घटना..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साजनने देहुरोड बाजार येथे गेल्या आठवड्यात सायंकाळच्या सुमारास पीडित महिला पायी जात असताना बळजबरीने महिलेला दुचाकीवर बसवून पुणे-मुंबई हायवे लगत असलेल्या सर्व्हिस रोड येथे नेऊन तिच्यानप बलात्कार केला होता. दरम्यान, आरोपीचा साथिदार अनिकेत झंझोटड याच्यासह त्याने पीडित महिलेला बेदम मारहाण करुन ते दोघेही पळुन गेले होते. आरोपी वापरत असलेल्या मोबाईलवरुन त्यांचा तपास करून आरोपींना रामवाडी येरवडा शिताफीने ताब्यात घेतले गेले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर, गुन्हे पोलीस निरिक्षक गोफणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर, पोलीस कर्मचार प्रशांत पवार, गणेश जगदाळे, सचिन शेजाळ, सुमित मोरे यांच्या पथकाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details