पुणे- शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मित्रांनीच आपल्या मित्राची गळा दाबून हत्या केली. दादासाहेब भाऊसाहेब नवले (वय 51) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे.
खळबळजनक..! मित्रांनीच घोटला मित्राचा गळा.. मृतदेह फेकला नदीपात्रात - पुणे मित्राची हत्या
दादासाहेब व त्यांच्या मित्रांनी रात्री एकत्र जेवन व मद्यपान केले. त्यानंतर ते गाडीतून घराकडे जात होते. दरम्यान, मित्रात आणि त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला केला की, दादासाहेब यांची मित्रांनी गळा दाबून हत्या केली.
हेही वाचा-'शरद पवारांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का?'
दादासाहेब व त्यांच्या मित्रांनी रात्री एकत्र जेवन व मद्यपान केले. त्यानंतर घराकडे ते गाडीतून जात होते. दरम्यान, मित्रात आणि त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला केला की, दादासाहेब यांची मित्रांनी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दादासाहेब यांचा मृतदेह शिरुर जवळील घोडनदीत पात्रात फेकून देण्यात आला. या प्रकरणी रांजणगाव पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मैत्रीनेच केला घात...
रांजणगाव परिसरात औद्योगिक वसाहतीचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जमिनीचे बाजारभाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर माणुसकी विसरुन मैत्रीत देखील घात केले होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे.