पुणे- जगभरात करोना विषाणूने आपली पायेमुळे रोवली आहे. कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी नागरिकांकडून देवाला प्रार्थना होत आहे. या काळात लॉकडाऊनमुळे गरीब लोकांनी आपले रोजगार गमवले आहेत. त्यांचे खायचे वांदे झाले आहे. भूकेने व्याकूळ असलेल्या अशा लोकांना पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडा जनविकास संघाने जेवण पुरविले आहे.
जनविकास संघाकडून गरजूंना शेंगदाण्याची चटणी आणि भाकर पुरवली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यासह देशातील अनेक कामगार या ठिकाणी नौकरी करतात. मात्र, करोना विषाणूचे संकट अचानक धडकल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांच्या जेवनाचे वांदे झालेत. अशा वेळी समाजिक जबाबदारी पाळत काही लोक आणि संस्थ्या गरिबांना अन्न पुरवण्यासाठी पुढे आले आहे. यातीलच मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार हे गेल्या तीन दिवसांपासून गरिबांना भाकरी आणि चटणी देण्याचे काम करत आहे.