पुणे- लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या गरीब कुंटूंबीयांची उपासमार होत आहे. गरजूंची ही समस्या लक्षात घेऊन शहरातील विविध पक्ष संघटना व दानशूर व्यक्तींनी गरजूंना भाजीपाल्यासह अन्न धान्याचे वाटप केले. मात्र टाळेबंदीचा कालीवधी वाढत गेल्याने गरजूंवर पुन्हा तीच परिस्थिती ओढवल्याचे लक्षात आल्यानतंर साईच्छा सेवा संस्थेच्यावतीने दररोज ४०० नागरिकांना १ वेळचे मोफत भोजन देण्यात येणार आहे.
बारामतीत ४०० गरजूंना मोफत भोजनाची सोय, साईच्छा ट्रस्ट संस्थेचा उपक्रम - बारामती कोरोना न्यूज
साईच्छा सेवा संस्थेव्दारे शहरातील गरजुंना १ वेळचे मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून मोफत भोजनाची सुरुवात झाली असून, या मोफत भोजनाचा ३०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. भोजनादरम्यान टाळेबंदीच्या नियमांचे पालन केले जात आहे.
![बारामतीत ४०० गरजूंना मोफत भोजनाची सोय, साईच्छा ट्रस्ट संस्थेचा उपक्रम free-meals-for-400-needy-in-baramati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7014107-542-7014107-1588317197357.jpg)
शहरात ठिकठिकाणी दाट लोकवस्ती आहे. या भागातील अनेक कुंटुंबीयांचे हातावरचे पोट आहे. अशा गरजू कुंटुंबीयांना टाळेबंदीत अनेकांकडून अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. मात्र धान्य दळून आणण्यास ही पैसे नसल्याने 'असून अडचण, नसून खोंळबा' अशी अनेकांची अवस्था झाली आहे. याचाच विचार करुन साईच्छा सेवा संस्थेव्दारे शहरातील गरजुंना १ वेळचे मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून मोफत भोजनाची सुरुवात झाली असून, या मोफत भोजनाचा ३०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. भोजनादरम्यान टाळेबंदीच्या नियमांचे पालन केले जात आहे.
टाळेबंदी दरम्यान शहरातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या आमराई भागातील डॉ आंबेडकर वसाहत व साळवे नगरमधील नागरिकांना संस्थेच्यावतीने भाजीपाला व किराणा वाटप करण्यात आला आहे. मात्र टाळेबंदीचा कालावधी वाढत गेल्याने अन्नासाठी कोणाचे हाल होऊ नयेत, गरीब गरजूंना या प्रसंगातून सावरण्यासाठी आपलाही थोडासा हातभार लागावा. या हेतून व आपले कर्तव्य समजून मोफत भोजन देण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष बिरजू मांढरे यांनी सांगितले.