महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाॅकडाऊन : घरी जाण्याच्या पाससाठी कोथरूडमध्ये 6 हजार मजुरांची मोफत तपासणी - मजुरांची तपासणी

कोथरूड पोलीस ठाण्यासमोच्या मंत्रा मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा ते साडेचार या वेळेत ही तपासणी करण्यात येत आहे. वेद्यकीय तपासणी करुन मजुरांना प्रमाणपत्र दिले जात आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे मजुरांना घरी जाण्यासाठीचा पास मिळतो.

मजुरांची मोफत तपासणी...
मजुरांची मोफत तपासणी...

By

Published : May 7, 2020, 3:44 PM IST

पुणे - केंद्र सरकारने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देत मजुरांना घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र, घरी जाण्यासाठी आवश्यक असणारा पास मिळवण्यासाठी मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यामुळे मजुरांना त्रास होऊ नये, म्हणून कोथरूडमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी करुन दिली जात आहे.

मजुरांची मोफत तपासणी...

हेही वाचा-लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...

कोथरुड पोलीस ठाण्यासमोच्या मंत्रा मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा ते साडेचार या वेळेत ही तपासणी करण्यात येत आहे. वैद्यकीय तपासणी करून मजुरांना प्रमाणपत्र दिले जात आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे मजुरांना घरी जाण्यासाठीचा पास मिळतो. या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी काही ठिकाणी रक्कम आकारण्यात येत आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूडमध्ये मोफत तपासणी केली जात आहे. आतापर्यंत जवळपास सहा हजार मजुरांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details