पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दारी आजपर्यंत कुणीही उपाशी पोटी झोपलेले नाही. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असताना देवाच्या आळंदीत 'एक हात मदतीचा' या संकल्पनेतून मोफत अन्नदान सुरू करण्यात आले आहे.
आळंदीत 'एक हात मदतीचा' संकल्पनेतून मोफत अन्नदान; नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम
देवाच्या आळंदीत प्राचीन काळापासून भिक्षा मागून खाण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वारकरी संस्थानमध्ये जाऊन अन्नाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती अशोक उमरगेकर यांनी दिली आहे. देवाच्या आळंदीत प्राचीन काळापासून भिक्षा मागून खाण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिणामी माधुकरी मागून खाणाऱ्यांच्या अन्नपाण्याची गैरसोय होत असताना आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या प्रयत्नातून मोफत अन्नदान करत 'एक हात मदतीचा' ही संकल्पना घेऊन अन्नदान सुरू करण्यात आले आहे.
अन्नदानाची ही सेवा पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे अशोक उमरगेकर यांनी सांगितले. आळंदी संपूर्ण राज्यातून वारकरी संप्रदायाचे शिक्षणासाठी अनेक तरुण, विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या सर्वांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी उद्यापासून प्राथमिक मोफत व औषधोपचार तपासणी करण्यात येणार आहे.