महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन : आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पोलिसांचा मदतीचा हात - world health emergency

दुर्गम आदिवासी भागात आणखी मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी अशाच प्रकारे आणखीही मदतीचे हात पुढे यावेत, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी केले.

आंबेगाव
आंबेगाव

By

Published : Apr 4, 2020, 8:43 AM IST

आंबेगाव (पुणे) - सध्या लॉकडाऊनमुळे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात अनेक कुटुंबांच्या दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यांना घोडेगाव पोलीस व पंचायत समितीतर्फे माणुसकीच्या भावनेतून किराणा साहित्य घरपोच मोफत देण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील दानशूर व्यक्तींच्या योगदानातून आदिवासी, कातकरी, ठाकर समाजांना ही मदत देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार यांच्या हस्ते वाटप झाले.

आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पोलीसांचा मदतीचा हात
आंबेगाव तालुक्यात दुर्गम भागात मोठ्या संख्येने आदिवासी, ठाकर, कातकरी समाजांचे वास्तव्य आहे. या सर्व कुटुंबांचे हातावरचे पोट आहे. आज कामधंदा केला तर, संध्याकाळी जेवण मिळते, अशा पद्धतीने या नागरिकांचा दिनक्रम असतो. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊन कडक केले आहे. या दुर्गम भागातील नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यांना सध्या गरजेपुरता किराणा माल पोलीस व प्रशासनाकडून मोफत वाटप करण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पोलीसांचा मदतीचा हात
सामाजातील अनेक घटक आजही अन्नासाठी संघर्ष करत आहे. त्यात कोरोनाचे संकट डोक्यावर आल्याने अनेक कुटुंबे संकटात आहेत. त्यापैकी आंबेगावात राहणाऱ्या काहींना दानशूरांनी दिलेल्या मदतीच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. दुर्गम आदिवासी भागात आणखी मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी अशाच प्रकारे आणखीही मदतीचे हात पुढे यावेत, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details