आंबेगाव (पुणे) : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत गावातील नागरिकांना काम मिळावे यासाठी मनरेगा विशेष रोजगार अभियान सुरू करण्यात आले. मात्र, आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या मजुरांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन, कामाची गरज नसल्याबाबत फसवून सह्या घेतल्याचा प्रकार घडला आहे. या मजुरांनी आता आमच्या हाताला काम द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनरेगात नोंदणी केलेल्या आंबेगाव तालुक्यातील मजुरांच्या प्रतिक्रिया... हेही वाचा...ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीत... खबरदारी म्हणून कलम 144 लागू
पुणे जिल्हा परिषदेने लॉकडाऊन काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी पुढाकार घेऊन मनरेगा विशेष रोजगार अभियान मे-२०२० रोजी सुरू केले होते. या अभियानात मजुरांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात सुमारे ७ हजार मजुरांनी कामाची मागणी केली आहे.
पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी मजुरांना कामाची गरज आहे, तेथील सर्व लोकांना मनरेगामार्फत कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश दिले आहेत. मात्र, आंबेगाव तालुक्यातील शिनोली भागात ऑनलाईन नोंदणी केली. मात्र, यावेळी मजुरांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कामाची गरज नसल्याबाबत सह्या घेतल्याने मजूर संतप्त झाले आहेत.