महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime News: धक्कादायक! नासाच्या नावाने घातला गंडा; शेकडो लोकांची कोट्यवधींची फसवणूक - गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सेक्सटॉर्शन, सायबर फसवणूक, अश्या अनेक घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशात पुण्यात अमेरिकेतील अंतराळ संशोधन नासाच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Crime
नासाच्या नावाने फसवणूक

By

Published : Feb 2, 2023, 9:59 AM IST

Updated : Feb 2, 2023, 10:12 AM IST

पुणे:पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने सहा कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘राइस पुलर’ यंत्राच्या विक्रीतून चांगला परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी राम गायकवाड (रा. अकलूज, जि. सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक फसवणुकीचेही अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आरोपींकडून गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन: याबाबत बाबासाहेब नरहरी सोनवणे (वय ५०, रा. शिवपार्वती सोसायटी, सातववाडीजवळ, गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राईस पूलर या यंत्राला मागणी असून या यंत्राच्या खरेदीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष आरोपींनी दाखविले होते. पुणे स्टेशन परिसरातील एका हाॅटेलमध्ये आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील प्रतिनिधी भारतात येणार आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज: ‘नासा’चे शास्त्रज्ञ या यंत्राचे परीक्षण करणार असून राइस पूलर यंत्रावर ते संशोधन करणार आहेत. राइस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी असल्याचे आरोपींनी गुंतवणूकदारांना सांगितले होते. बनावट कागदपत्रांद्वारे आरोपींनी नागरिकांकडून पैसे गोळा केले, असे साेनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या १०० नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतपर्यंत पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रुइकर पुढील तपास करत आहेत.

24 डिसेंबरची घटना: सायबर भामट्याने पुण्यातील स्टेट बँकेच्या मुख्य ट्रेझरी शाखेच्या मॅनेजरची 19 लाखाची फसवणूक सायबर भामट्याकडून करण्यात आली होती. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ या ज्वेलर्सचे डायरेक्टर किशोर कुमार शहा बोलत आहे. असे सांगून बँकेला बनावट ई-मेल पाठवत 19 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करायला सांगून मॅनेजरची फसवणूक केली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा:Mumbai Crime: दंडाच्या मेसेजमुळे लागला चोरी झालेल्या गाडीचा सुगावा; सराईत आरोपीकडून पंधरा दुचाकी जप्त

Last Updated : Feb 2, 2023, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details