महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fraud in Disability Certificate: तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाचा अजब कारभार; गैरव्यवहाराची तक्रार देणाऱ्या व्यक्तीचीच चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक - Tanaji Sawant

राज्यात दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आल्यानंतर याचा कार्यभार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना देण्यात आला आहे. त्यानंतर बोगस प्रमाणपत्राच्या बाबतीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काही अधिकारी सहभागी असल्याच्या काही दिव्यांग नागरिकांनी तक्रारी केल्या. या संदर्भातले पुरावे सुद्धा मंत्रालय आयुक्तांना, ससून हॉस्पिटलला देण्यात आले. परंतु ज्या व्यक्तीने हे पुरावे दिले, त्याच व्यक्तीची या संदर्भात चौकशी करा. आम्ही तुमची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करत आहोत, त्याचा अहवाल शासनाला द्या, असे पत्रच विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे.

Tanaji Sawant
सुरेखा ढवळे

By

Published : Aug 3, 2023, 8:08 AM IST

प्रतिक्रिया देताना दिव्यांगासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या सुरेखा ढवळे

पुणे : सुरेखा ढवळे या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक बोगस प्रकार शासनाच्या लक्षात आणून दिले. त्या संदर्भातील तक्रारीही दिल्या आहेत. पूर्वी व्यक्ती दिव्यांग म्हणून अपात्र आहे, त्याच व्यक्तीला दुसऱ्या लिस्टमध्ये पात्र करण्यात आले आहे. हा सगळा कारभार शासनाच्या रेकॉर्डवरती आहे. सुरूवातीला अपात्र ठरणारा व्यक्ती, नंतर पात्र कसा होतो? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होत आहे. त्यामुळे यामध्ये मोठे रॅकेट आहे का? याची सखोल चौकशी करून खऱ्या दिव्यांगांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे.


दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र :काही प्रकरणात तर सुरूवातीला 40 टक्के दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या प्रकरणात पात्र करून 80 टक्के किंवा वेगळे दिव्यांगत्व दाखवून सर्टिफिकेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दरवर्षी दिव्यांगाची व्याख्या कशी बदलते? असा देखील प्रश्न आता निर्माण होत आहे. शासनाने दिव्यांग व्यक्तीची थट्टा थांबवून या सगळ्या प्रकरणांची चौकशी करावी. मी काय शासकीय अधिकारी नाही. कुठल्या अधिकाराने मी चौकशी करून अहवाल द्यायचा? हा प्रश्न देखील असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा ढवळे यांनी म्हटले आहे.


बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट :एकीकडे राज्यातील दिव्यांगाच्या प्रमाणपत्रासाठी दिव्यांग व्यक्ती शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत असतात. परंतु, काही बोगस व्यक्ती फायदे मिळावे, शासकीय नोकरी मिळावी व सगळ्या योजनांच्या फायदा घेण्यात यासाठी नियमांचे उल्लंघन करतात. 40 टक्के, 30 टक्के दिव्यांगत्व दाखवून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेतात. अशा बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. दिव्यांगाचे प्रश्न मांडणारे बच्चू कडू यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी मान्य करून घेतली. पण, या मंत्रालयाचा कार्यभार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आहे. अशा स्थितीत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर कोण कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा :

  1. Health minister on corona : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला घाबरण्याचे कारण नाही - आरोग्यमंत्री सावंत
  2. Maharashtra Corona : राज्यात सध्या मास्क अनिवार्य नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती
  3. Illegal Abortion अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी, आरोग्यमंत्री तानाजी सावंत

ABOUT THE AUTHOR

...view details