पुणे - येथील चाकण औद्योगिक वसाहतीतील वासुली फाटा येथे आज(शुक्रवार) 12 वाजताच्या सुमारास दुकानांना मोठी आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिक, अग्निशामक दल व पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आग व धुराचे लोट असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे येत होते. तर, पाच तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील वासुली फाटा येथे चार दुकाने आगीच्या भस्मस्थानी
लॉकडाऊनमध्ये छोट्या मोठ्या दुकानदारांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर काही नियम व अटींवर दुकाने सुरू करण्यात आली.
चाकण औद्योगिक वसाहतीतील वासुली फाटा
लॉकडाऊनमध्ये छोट्या मोठ्या दुकानदारांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर काही नियम व अटींवर दुकाने सुरू करण्यात आली. मात्र, दुकानांकडे कोन्हीही फिरत नसल्याने दुकानदार अडचणींचा सामना करत आहेत. अशातच चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये आज चार दुकानांना आग लागली. या आगीत दुकानासह आतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर, वसुली फाटा येथील दुकानांना लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.