पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; चार जण जागीच ठार - पुणे सोलापूर महामार्ग अपघात
पुणे-सोलापूर महामार्गावरुन एर्टीगा (एम.एच ४६,बी ४५१५) ही कार पुण्याकडे जात असताना अचानक गाडीचा टायर फुटल्याने रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येऊन सोलापुरकडे जाणाऱ्या बोलेरो (एम.एच १३ ए.झेड ३९०१) या गाडीला वेगात धडकली. या भीषण अपघातात बोलेरो गाडीमधील तीन तर एर्टीगामधील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

इंदापूर (पुणे) - इंदापूर शहरानजीक पुणे-सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले आहेत. इंदापूर शहराजवळील एका हॉटेल जवळ दुपारच्या सुमारास ही भीषण घडली आहे. शरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गोडसे यांच्यासह तिघा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावरुन एर्टीगा (एम.एच ४६,बी ४५१५) ही कार पुण्याकडे जात असताना अचानक गाडीचा टायर फुटल्याने रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येऊन सोलापुरकडे जाणाऱ्या बोलेरो (एम.एच १३ ए.झेड ३९०१) या गाडीला वेगात धडकली. या भीषण अपघातात बोलेरो गाडीमधील तीन तर एर्टीगामधील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. पंढरपूर तालुक्यातील गणेश गोडसे हे शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे. या अपघातात गणेश गोडसे, अविनाश पवार, गोविंद गोडसे असे बोलेरो गाडीत तिघा जणांचा तर एर्टीगा गाडी मधील एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.