पुणे-पुणे-नगर रस्त्यावरील खांदवेनगर परीसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने दगडफेक करत तसेच हातात लाठ्याकाठ्या, कोयते घेऊन चार जणांना जबर मारहाण केली. पार्किंगच्या वादातून ही घटना घडली आहे. खांदवेनगर परिसरात जकात नाक्याजवळील वाघेश्वर पार्किंगमध्ये १६ जूनच्या रात्री ही घटना घडली.
पुण्यात पार्किंगच्या वादातून 4 जणांना लाठ्याकाठ्याने मारहाण; घटना सीसीटीव्ही कैद - Pune
खांदवेनगर परीसरात पार्किंगच्या वादातून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने दगडफेक करत तसेच हातात लाठ्याकाठ्या, कोयते घेऊन चार जणांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पुण्यात पार्किंगच्या वादातून चार जणांना लाठ्याकाठ्याने मारहाण
मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विमानतळ पोलिसांनी यातील 6 आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपी अजून फरार आहेत.
Last Updated : Jun 21, 2019, 1:34 PM IST