पुणे - राजेगाव खानवटे रस्त्यावरून दोन दुचाकींसह चार दुचाकीस्वार वाहून गेले आहेत. संततधार पावसाने राजेगावला जोडण्यात आलेला मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. रात्रीच्या वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला आहे. चौघेही खानवटे येथील रहिवासी आहेत. त्यांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने आज सकाळी बाहेर काढण्यात आले.
#puneflood : दौंडमध्ये दुचाकीस्वार प्रवाहात वाहिले...चौघांचा मृत्यू - daund flood news
राजेगाव खानवटे रस्त्यावरून दोन दुचाकींसह चार दुचाकीस्वार वाहून गेले आहेत. संततधार पावसाने राजेगावला जोडण्यात आलेला मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. रात्रीच्या वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला आहे.
अंधार असल्याने तसेच पाण्याच्या वाढलेल्या पातळीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. वाहून गेलेल्या चौघांमधील तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप एकाचा शोध सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे सध्या रस्त्यावरून सुमारे चार ते पाच फूट पाण्याचा प्रवाह वाहत आहे. तसेच राजेगाव ते भिगवण रस्त्यावर तुकाई मंदिराजवळील ओढ्याला महापूर आला. त्यामुळे हा मुख्य रस्ता बंद आहे . तसेच राजेगाव ते दौंड रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी ओसंडून वाहत आहे. छोटे मोठे ओढे-नाले त्यामुळे वाहतूक पूर्ण बंद आहे. गावातील वाड्यावस्त्यांना जोडणारे लहान मोठे रस्ते देखील पाण्याखाली आहेत. त्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटलाय.