पुणे- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील देवजाळी येथे इतर तीन घरांसह लग्न घरात अचानक आग लागून घरगुती साहित्य जळून खाले. मात्र, यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
जुन्नरमध्ये लग्न घरासह अन्य तीन घरांना आग.. गृहोपयोगी सामान जळून खाक
हिवरे तर्फे नारायणगाव येथील गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे यांच्या घरांना आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. चारही घरे आगीत जळून खाक झाली.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे यांच्या घरांना आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. चारही घरे आगीत जळून खाक झाली. यामध्ये सयाजी मधे यांच्या कुटुंबातील छकुली मधे या मुलीचे 12 डिसेंबरला लग्न असल्याने घरात लग्नाचा बस्ता, बाजार साहित्य, मुलीचे दागिने, कुटुंबातील संसारपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, चारही घरे आगीत जळून खाक झाली.
दरम्यान, ग्रामपंचायतच्या माध्यमातून चारही कुटुंबात संसारोपयोगी साहित्य आणून देण्याचे आश्वासन देण्यात आले असून सयाजी मधे यांच्या मुलीच्या लग्नातील इतर खर्च आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.