पुणे - पुणे- नगर महामार्गावर शिरूर येथे कंटेनर व कारचा भिषण अपघात घडला. या अपघातात २० दिवसाच्या बाळासह एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कारचा झाला चेंदामेंदा; पुणे- नगर महामार्गावर २० दिवसांच्या बाळासह तीघांचा जागीच मृत्यू - car accident
अपघात नुकतेच जन्मलेले २० दिवसाचे लहान बाळही ठार झाले आहे. या महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
पुणे-नगर महामार्गावर बंद पडलेल्या कंटेनरला अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या वॅगनर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात घडला आहे. यामध्ये कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यु झाला. अपघातातील सर्व मृत नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अपघात नुकतेच जन्मलेले २० दिवसाचे लहान बाळही ठार झाले आहे. लिंबाजी हके, किशोर हके, विमल हके अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
पुणे-नगर महामार्गावर दिवसेंदिवस होणार वाहतुक कोंडी व अवजड वाहनांची शहरी भागातून होणारी वाहतूक यामुळे अपघातांची मालिका गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.