जुन्नर (पुणे) - कल्याण अहमदनगर महामार्गावर वडगाव आनंद येथे आज पहाटेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.
कल्याण अहमदनगर महामार्गावर टेम्पो व पिकअपचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू - कल्याण अहमदनगर महामार्ग अपघात
कल्याण अहमदनगर महामार्गावर वडगाव आनंद येथे आज पहाटेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.
![कल्याण अहमदनगर महामार्गावर टेम्पो व पिकअपचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू kalyan ahmednagar highway accident junnar accident junnar latest news कल्याण अहमदनगर महामार्ग अपघात जुन्नर अपघात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8586990-190-8586990-1598591785326.jpg)
जुन्नर तालुक्यातील कल्याण अहमदनगर महामार्गावर आळेफाट्या जवळील वडगाव आनंद येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातातील टेम्पो हा कोंबडी खत घेवून आळेफाट्याकडून कल्याणच्या दिशेने जात होता, तर पिकअप भाजीपाला विकून कल्याणकडून आळेफाट्याच्या दिशेने येत होता. वडगाव आनंद गावाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये पीकअपमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गालगत अनेक गावं आहेत. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी नागरिक करत आहेत.