पुणे - कात्रज प्राणी संग्रहालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्यावेळी प्राणी संग्रहालयात प्रवेश करुन चार हरणांची शिकार केली. रात्री प्राणीसंग्रहालयात प्रवेश केलेल्या कुत्र्यांनी हरणांचा कळप असलेल्या खंदकात शिरुन दोन नर आणि दोन मादी अशा एकूण चार हरणांची शिकार केली. या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक हरीण गंभीर जखमी झाले आहे.
चार हरणांचा फडशा
कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राणीसंग्रहालयातील सुरक्षारक्षकांनी हरणांचा कळप असलेल्या खंदकाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत या कुत्र्यांनी चार हरणांचा फडशा पाडला होता. त्यानंतर या कुत्र्यांना डॉग स्कॉडच्या मदतीने भूल देऊन पकडण्यात आले आहे.