महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dead Bodies Found In Bhima River : पुण्यातील भीमा नदीत सापडले पाच दिवसात चार मृतदेह; मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता - Pune crime

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रात सलग पाच दिवसात चार मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत.

Dead Bodies Found In Bhima River
पुण्यातील भीमा नदीत सापडले पाच दिवसात चार मृतदेह

By

Published : Jan 24, 2023, 2:10 PM IST

Updated : Jan 24, 2023, 2:28 PM IST

पुणे : हे सर्व मृतदेह ३८ ते ४५ या वयोगटातील असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सापडलेल्या मृतदेहांपैकी तीन मृतदेहांचे शवविच्छेदन झाले आहे. तपासाला दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

भीमा नदीत सापडले पाच दिवसात चार मृतदेह


पाच दिवसात एकूण चार मृतदेह :दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छिमार 18 जानेवारीला मासेमारी करत होते. त्यावेळी त्यांना पुण्यातील भीमा नदीत एका स्त्रीचा मृतदेह त्यांना आढळून आला. तसेच २० जानेवारीला अजून एका पुरुषाचा मृतदेह आढळला. तसेच 21 तारखेला पुन्हा एका स्त्रीचा मृतदेह आढळला. लगेच 23 तारखेला पुन्हा पुरुषाचा मृतदेह आढळला. असे पाच दिवसात एकूण चार मृतदेह आढळले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू : या मृतदेहांमध्ये नवरा बायकोच्या जोडी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी यानंतर भीमा नदीपात्रात कसून शोधकार्य सुरू केले आहे. तसेच परिसरातदेखील या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या मृतदेहासोबत त्यांची मुले असण्याची देखील शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. यातील मृतदेहांसोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

साताऱ्यातील डिसेंबरमधील घटना :साताऱ्यातील कण्हेर धरणाच्या जलाशयात तरूणासह एका तरूणीचा मृतदेह आढळला होता. ज्योत्स्ना कुमार लोखंडे आणि अरबाज इब्राहिम देवानी अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. 9 डिसेंबरला दुपारी कण्हेर धरणातील पाण्यावर मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला होता, तर मुलाचा मोबाईल आणि गॉगल धरणाशेजारी सापडला होता. त्यानंतर शोधाशोध केल्यावर मुलाचाही मृतदेह सापडला होता. यावरूनच प्रेमी युगल असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ माजली होती. आत्महत्या करणारे प्रेमी युगल असावेत, या संशयातून सातारा ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला होता.

पुण्यातील भीमा नदीत सापडले पाच दिवसात चार मृतदेह

हेही वाचा : Kidnapping News : खळबळजनक! दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण ; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Last Updated : Jan 24, 2023, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details