पुणे - चाकण औद्योगिक परिसरात एका व्यापाऱ्याने खंडणी न दिल्याने त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, व्यापाऱ्याने पैसे दिल्यानंतर गुन्हेगारांनी सोडून दिले. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या चाकण पोलिसांनी आवळल्या आहे.
पैशासाठी सराईत गुन्हेगारांनी केले व्यापाऱ्याचे अपहरण; चार जणांना अटक हेही वाचा - अमेरिकन डॉलरची चोरी करणाऱ्या आरोपीला हैदराबादमधून अटक
चाकण मधील रंजन गिरी (वय 30) या व्यापाऱ्याकडे चार लाख रुपयांची मागणी करत चेतन राऊत व गणेश नाईक या सराईत गुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने व्यापाऱ्याचे अपहरण केले होते. जवळ असणारे पैसे काढून नंतर नातेवाईकांकडे अधिकच्या पैशाची मागणी केली होती. दरम्यान, पैसे मिळत नसल्याने व्यापाऱ्याला सोडण्यात आले.
व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतल्यानंतर त्याच्या तक्रारीवरून चाकणमधील दोन सराईत गुन्हेगारांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 15 हजार रुपये ताब्यात घेण्यात आले आहे. चेतन शिवाजी राऊत, दिशांत अशोक केळकर, सौरभ प्रकाश इंगळे, आणि गणेश प्रकाश नाईक, अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत
हेही वाचा - सिडको परिसरात चोरट्यांचा डल्ला, दोन लाखांचा ऐवज केला लंपास