महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात फॉर्च्युनर गाडी चोरीचे सत्र सुरूच, आता नगरसेवक रवींद्र धंगेकरांची गाडी चोरीला - stolen

धंगेकर राहत असलेल्या तोफखाना येथील त्यांच्या घरासमोरून ही कार चोरीला गेली आहे. चोरट्यांनी कसबा पेठेततून राजवर्धन शितोळे यांची फॉर्च्युनर गाडी चोरली. त्यानंतर त्याच कारने धंगेकर यांच्या घराजवळ येऊन बाहेर उभी असलेली कार चोरली. मागील काही दिवसांपासून वाहन चोरांनी फॉर्च्यूनर गाड्यांना लक्ष्य केले आहे.

पुण्यात फॉर्च्युनर गाडी चोरीचे सत्र सुरूच, आता नगरसेवक रवींद्र धंगेकरांची गाडी चोरीला

By

Published : May 2, 2019, 6:55 PM IST

पुणे -मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेले फॉर्च्युनर गाड्या चोरीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आणखी दोन गाड्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. पुणे महापालिकेतील नगरसेवक रवींद्र धंगेकर यांची फॉर्च्युनर गाडी मंगळवारी (30 एप्रिल) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. गाडी चोरीचा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. अवघ्या १७ मिनिटांमध्ये चोरट्यांनी फॉर्च्युनरचे लॉक उघडून गाडी चोरून नेली.

पुण्यात फॉर्च्युनर गाडी चोरीचे सत्र सुरूच, आता नगरसेवक रवींद्र धंगेकरांची गाडी चोरीला

धंगेकर राहत असलेल्या तोफखाना येथील त्यांच्या घरासमोरून ही कार चोरीला गेली आहे. चोरट्यांनी कसबा पेठेततून राजवर्धन शितोळे यांची फॉर्च्युनर गाडी चोरली. त्यानंतर त्याच कारने धंगेकर यांच्या घराजवळ येऊन बाहेर उभी असलेली कार चोरली. मागील काही दिवसांपासून वाहन चोरांनी फॉर्च्यूनर गाड्यांना लक्ष्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी भाजपचे नगरसेवक दिपक पोटे व विनोद वस्ते यांच्या फॉर्च्यूनर गाड्या चोरल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या या गाड्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या पोलिसांच्या नाकेबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details