पुणे -अयोध्या खटल्याचा निकाल अनपेक्षित नव्हता. देशातील सर्व घटकांनी त्याचे स्वागत करायला पाहिजे. अयोध्येचा निकाल म्हणजे कुण्या एका पक्षाचा विजय नाही, तर आपल्या देशाची अस्मिता असलेल्या संविधानाचा विजय झाला. धर्मनिरपेक्षतेच तत्त्व याच्या मुळाशी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.
अयोध्येचा निकाल एका पक्षाचा जय नसून संविधानाचा विजय - माजी न्यायमूर्ती सावंत - सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत
सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल दिला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी न्यायमूर्ती सावंत
आता सरकारने सरकारी खर्चाने मुस्लीम समुदायाला अयोध्येत मशिद बांधून द्यायला पाहीजे. त्याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करेल अशी ताजमहालासारखी वास्तू उभी करावी. त्यामुळे जगभरातील मुस्लीम बांधव याठिकाणी येऊ शकले. काही धर्मांद शक्ती धर्माच्या नावाखाली राजकारण करत होत्या. तसेच राजकारणाचे धार्मिकीकरण आणि धर्माचे राजकीयकरण करत होत्या. त्यांच्या हातातले हत्यारे गळून पडले असल्याचे देखील माजी न्यायमूर्ती सावंत म्हणाले.