पुणे - भीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी ( Bhima Koregaon Violence ) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ( Former Pune Cp Rashmi Shukla ) चौकशीसाठी भीमी कोरेगाव चौकशी आयोगासमोर ( Bhima Koregaon Investigation Commission ) हजर झाल्या आहेत. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी 11 वाजता चौकशीला सुरुवात झाली असून 5 वाजेपर्यंत सुरू राहणार चौकशी राहणार आहे.
Bhima Koregaon Violence : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर हजर - rashmi shukla over bhima koregaon violence
भीमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी ( Bhima Koregaon Violence ) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ( Former Pune Cp Rashmi Shukla ) चौकशीसाठी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर ( Bhima Koregaon Investigation Commission ) हजर झाल्या आहेत.
२०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने याप्रकरणी माजी न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. आज सकाळीच रश्मी शुक्ला भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर हजर झाले आहेत.
- काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभ आहे, जो आंबेडकरी जनतेसाठी प्रेरणास्थान असून दरवर्षी १ जानेवारी रोजी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनता अभिवादनासाठी येते. दरम्यान, ज्या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारला, त्या लढाईला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या ठिकाणी मोठा जनसमुदाय लोटला होता. याचवेळी या ठिकाणी हिंसाचार उसळला होता.