बारामती -जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ, माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांचा जन्म बारामतीमधील निंबूत गावी झाला होता.
सहकार क्षेत्रात भरीव योगदान
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून देखील ते निवडून आले होते. ते प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखानदारी आणि सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
हेही वाचा -अमरावतीतील निर्बंधांतून दूध व्यवसायास वगळण्याची मागणी