पुणे -काल माजी आमदार विनायक निम्हण ( Former MLA Vinayak Nimhan ) यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन ( Former MLA Vinayak Nimhan Passed Away ) झालं. निम्हण यांचं निधन होऊन एक दिवस झाला नाही की, पुण्यात आज वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी राजकीय फराळ आयोजित करण्यात ( Organization all party political Diwali Faral ) आला होता. निम्हण यांच्या बरोबर सहकारी असलेले शहरातील राजकारणात काम करण्याऱ्या मंडळींकडून अशा प्रकारचं कृत्य करने हे दुर्दैवी आहे असे, मत भूमाता ब्रिगेडचे अध्यक्षा तृप्ती देसाई ( President of Bhumata Brigade Trupti Desai ) यांनी व्यक्त केलं आहे.
Trupti Desai : निम्हण यांच्या निधनानंतर राजकीय फराळाचे आयोजन, तृप्ती देसाई यांची नाराजी
निम्हण यांचं निधन होऊन एक दिवस झाला नाही की, पुण्यात आज वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी राजकीय फराळ आयोजित करण्यात ( Organization all party political Diwali Faral ) आला होता. निम्हण यांच्या बरोबर सहकारी असलेले शहरातील राजकारणात काम करण्याऱ्या मंडळींकडून अशा प्रकारचं कृत्य करने हे दुर्दैवी आहे असे, मत भूमाता ब्रिगेडचे अध्यक्षा तृप्ती देसाई ( President of Bhumata Brigade Trupti Desai ) यांनी व्यक्त केलं आहे.
देसाई पुढे म्हणाल्या खरंतर हा कार्यक्रम ढकलता आला असता. कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले. त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत. आज फराळ करताना, पदार्थांवर ताव मारताना वाडेश्वर कट्ट्यावर दिसलेले आबांचे हे सर्वच सहकारी जवळचे
मित्र एन्जॉय करताना दिसले. कदाचित कट्ट्यावर श्रद्धांजली ही यांनी वाहिली असेल परंतु त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे सर्व झाले. त्याचा निषेधच आहे अस, देखील यावेळी देसाई म्हणाले. आबांवर जी वेळ आली ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे. परंतु राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकत मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीला पडलेला आहे अस, देखील यावेळी देसाई म्हणाल्या.