पुणे - आज सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निम्हण हे सुरवातीला शिवसेनेत होते. नंतर ते काँग्रेस पक्षात होते. परत ते शिवसेनेत गेले.
माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Former MLA Vinayak Nimhan
माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निम्हण हे सुरवातीला शिवसेनेत होते. नंतर ते काँग्रेस पक्षात होते. परत ते शिवसेनेत गेले.
दुपारी दोनच्या सुमारास विनायक निम्हण यांना हृदय विकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पाषाण स्मशानभूमीत आज रात्री नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगरमधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते. नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विनायक निम्हण यांनी दोनवेळा शिवसेनेकडून आणि त्यानंतर 2009 मध्ये काँग्रेसकडून आमदार म्हणून ते निवडून आले होते.
माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते. त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे आजही त्यांच्या घरातील टेरेसवर शिवसेनेचा झेंडा लावण्यात आलेला आहे.