पिंपरी चिंचवडसलग सहावेळा शिरूर विधानसभा मतदारसंघातून Shirur Assembly Constituency निवडणूक लढविणारे आणि त्यातील दोन वेळा विजय प्राप्त करणारे माजी आमदार बाबूराव काशीनाथ पाचर्णे वयाच्या ७१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले पुत्र राहुल पाचर्णे एक मुलगी जावई कर्नल महेश शेळके नातवंडे चार भाऊ पाच बहिणी असा परिवार आहे पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यावर व विशेषतः शिरूर पंचक्रोशीवर शोककळा Former BJP MLA Baburao Pacharne Passed Away पसरली.
शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. बाबुराव पाचर्णे यांनी 2004 ते 2009 आणि 2014 ते 2019 या कालावधीत शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यानच त्यांच्या प्रकृतीविषयी कुरबुरी सुरू झाल्या होत्या त्या निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते दीड वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले परंतु दीड वर्षाच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर येथील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली
शेतकरी कुटुंबात जन्म तालुक्यातील तर्डोबाची वाडी या एका छोट्याशा वाडीतील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबूराव पाचर्णे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती राजकारणात कुणीही मार्गदर्शक नसताना त्यांनी गावपातळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केली व थेट तालुक्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते शिरूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात झाली सन १९७८ ते ८४ या काळात ते ग्रामपंचायत सदस्य होते
शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसाय उभा करून दिला शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवित त्यांनी तालुका पातळीवरील राजकारणात प्रवेश केला २८ जानेवारी १९८५ ते २२ जुलै १९९३ अशी सलग आठ वर्षे बाजार समितीचे सभापतीपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली या काळात त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले भव्य दिव्य व्यापारी संकुल उभे करून शेतकऱ्यांच्या मुलांना विविध व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून दिले १९९३ ला झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत ते पुन्हा संचालक म्हणून निवडून आले