वाढदिवसाला झालेला 'तो' कार्यक्रम लोकसंस्कृतीला धरूनच; माजी आमदार दिलीप मोहिते यांचे स्पष्टीकरण - माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील
दुष्काळी परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केल्यानंतर मोहिते-पाटील यांनी स्पष्टीकरण देत, माझ्या वाढदिवसाला घेतलेला कार्यक्रम हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असल्याचे सांगितले.
![वाढदिवसाला झालेला 'तो' कार्यक्रम लोकसंस्कृतीला धरूनच; माजी आमदार दिलीप मोहिते यांचे स्पष्टीकरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3388901-thumbnail-3x2-pund.jpg)
पुणे
पुणे - सध्या दुष्काळी परिस्थिती असताना खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केल्यानंतर मोहिते-पाटील यांनी स्पष्टीकरण देत, माझ्या वाढदिवसाला घेतलेला कार्यक्रम हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असून माझ्या गावात कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला असल्याचे सांगितले.
पुणे