पुणे: कसबा पोट निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान, दुपारी 1 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान झाले असून अजूनही दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप थांबत नाही. काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी भाजपचे आमदार सुनील कांबळे आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी देखील बागवे यांच्यावर आरोप केले आहेत.
काय आरोप केले?: कसबा पोट निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. अशातच काँग्रसचे नेते रमेश बागवे यांनी देखील भाजपचे आमदार सुनील कांबळे आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की, निवडणूक हीच वेळ संपला असला तरी भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील कांबळे हे मतदार संघात 15--15 वाहने फिरत होते. तसेच ते त्यांच्या कार्यालयात पैसे वाटप देखील करत होते. गुंडांनासोबत घेऊन फिरत होतो ते लोकशाहीला मारक नसून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी बागवे यांनी केली आहे.
खोटे आरोप केल्याची टीका: माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, रमेश बागवे जे आमच्यावर आरोप करत आहे. ते खोटे आरोप आहे. गुंडांची भाषा त्यांनी आमच्या समोर करू नये. कारण ज्यांना गुंडांचा सहवास आहे. त्यांनी आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. आज सगळ्यांना माहीत आहे की, कोणाचे दारूचे दुकान आहे, असे आरोप यावेळी कांबळे यांनी बागवे यांच्यावर केले आहेत.