बारामती :आम्ही मराठ्यांचे नेते आहोत असे सांगतात परंतू महाराष्ट्रातील मराठा नेते जर कोणी संपवले असतील तर ते पवारांनी संपवले असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत बोलताना ( Vijay Shivtare criticize Sharad Pawar ) केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या विस्तारासाठी माजी मंत्री विजय शिवतारे बारामती इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर ( Vijay Shivtare Baramati tour )आहेत.
ईस्टइंडिया कंपनीचे उदाहरण :ईस्टइंडिया कंपनीचे उदाहरण देत शिवतारे म्हणाले की, ईस्टइंडिया कंपनीने व्यवहार करत अख्या देशावर कब्जा करून लंडनला निघून गेली. आणि महाराष्ट्रात पवार कंपनी आली. बारामती, इंदापूर तालुक्यातील साखर कारखाने काकडे, शेम्बेकर, जाचक यांनी मोठ्या मेहनतीने उभारले. मात्र सत्ता आणि पैशाच्या जोरावर कारखाने ताब्यात घेतले. सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचारातून ( government power Corruption ) जमवलेल्या पैशातून निवडणुका जिंकायच्या असा घनाघातही यावेळी त्यांनी केला.