पुणे : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानाने त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलने केली जात आहे. (Sambhaji Maharaj controversy). यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी आपलं मत व्यक्त करत आमच्यासाठी स्वराज्य रक्षक हे महत्त्वाचं असून आम्ही स्वराज्य रक्षकचं म्हणणार असल्याचं सांगितलं. (Dattatray Bharne on Sambhaji Maharaj controversy).
शरद पवार यांचे मत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील याविषयी आपलं मत व्यक्त करत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र असून ज्याला धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणावं, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचं आहे त्याने स्वराज्यरक्षक म्हणावं, असे म्हटले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त : पुणे जिल्ह्यातील शिरूर व बारामती या तालुक्यातील बैठक सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील संघटना यांच्या काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीचा आज आढाव घेतला. तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची काय मदत घेता येईल याची माहिती दिली. राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद जास्त आहे त्यामुळे मतभेद आहेत हे मात्र खरं आहे त्यावर देखील चर्चा झाली, असं देखील यावेळी भरणे म्हणाले.
कोरोना मुळे विकास करता आला नाही : जिल्ह्यातील बारामती, शिरूर मतदार संघावर भाजप नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. यावर भरणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, भाजपचे बारामती आणि शिरूर मध्ये कोणी आलं तर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारचं निवडून येईल. बाहेरचं कोणी ही आला तरी लोक इथं राष्ट्रवादीलाच ताकद देतील, कारण इथल्या लोकांना जिल्ह्यातील काय समस्या आहे ते माहीत आहे. अडीच वर्ष आमची आत्ता होती पण कोरोना मुळे आम्हाला विकास कामे करता आली नाहीत मात्र तरीही आम्ही काम केलं, असं देखील भरणे यावेळी म्हणाले. अजित पवार यांना भाजप टार्गेट करत आहे का यावर भरणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी अजित पवार यांच्या वर टीका केली जात आहे. आम्ही स्वराज्यरक्षकच म्हणणार आहोत. ज्यांना कोणाला काय म्हणायच ते त्याने म्हणावे, असे देखील यावेळी भरणे म्हणाले.