शिक्रापूर (पुणे) -पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल पोलीस कोठडीत असताना, आता पुन्हा त्यांच्यासह दोन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगलदास विठ्ठल बांदल, गुलाब दशरथ पवार (दोघे रा. शिक्रापूर) व दिनेश जयसिंग कामठे (रा. जातेगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
बांदल आधीच्या गुन्ह्यात अटक
शिक्रापूर पोलीसांनी बांदल यांना यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यात अटक केली आहे. दरम्यान न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असताना, आता जातेगाव बुद्रुक येथील रवींद्र सातपुते यांना शिवाजीराव भोसले बॅंकेबाबत काहीही माहिती नसताना मंगलदास बांदल, गुलाब पवार व दिनेश कामठे यांनी सातपुते यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रांचा वापर करून सातपुते यांच्या खोट्या सह्या करून बॅंकेचे कर्ज काढले.