महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांना अटक - जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांना पोलिसांनी अटक केली आहे. मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून पैशांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Former Chairman of Health and Construction Committee of Pune Zilla Parishad Mangaldas Vitthalrao Bandal arrested
मंगलदास विठ्ठलराव बांदल

By

Published : May 27, 2021, 7:16 AM IST

पुणे -जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांना अटक करण्यात आली आहे. मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्या नावावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून सव्वा कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता फसवणूक केल्याचा ठपका बांदल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय मांढरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलदास बांदल यांनी मांढरे यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्यानंतर बांदलला पैशाची खूप गरज असल्याचे सांगत मांढरे यांच्या नावावर खोटे खरेदीखत तयार करून त्याद्वारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून प्रथम 8 लाख रुपये कर्ज घेतले. ते स्वतःच्या आर्थिक फायदयसाठी वापरले. त्यानंतरही मांढरे यांचे कुलमुखलत्यारपत्र (पावर ऑफ अॅटर्नी) व बनावट पुरवणी दस्तऐवज तयार केले. तसेच मांढरे यांच्या बँकेतून 1 कोटी 25 लाख रुपये कर्ज काढले. मात्र त्याचे हप्ते न भरता 2 कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी करत फसवणूक केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात बांदल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.

कोण आहेत मंगलदास बांदल -

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष
-पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य
-जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती
-विद्यमान जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांचे पती
-शिरूर विधानसभा मतदार संघातून 2009 साली भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
एक वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली असून बांदल यांच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details