महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या; भीमा नदीवरील बंधाऱ्यात मारली उडी - वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष

राजगुरुनगर येथील भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. संबंधित व्यक्ती वकील बार असोसिएशनची माजी अध्यक्ष असून नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

suicides in rajgurunagar
राजगुरुनगर येथील भिमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.

By

Published : Jun 16, 2020, 7:55 PM IST

पुणे - राजगुरुनगर येथील भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. संबंधित व्यक्ती वकील बार असोसिएशनची माजी अध्यक्ष असून नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. अॅड चंद्रशेखर टाकळकर (वय 48) असे आत्महत्या केलेल्या वकीलाचे नाव आहे.

राजगुरुनगर येथील भिमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज करून अॅड चंद्रशेखर टाकळकर सहकारी वकीलासमवेत दुचाकीवरून केदारेश्वर बंधाऱ्याजवळ गेले. यानंतर त्यांनी सोबत असलेल्या मित्राला जाण्यास सांगितले. यानंतर काही वेळाने चंद्रशेखर यांनी बंधा-यात उडी मारली. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनाम्यानंतर चांडोली ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मागील पंधरा दिवसांत राजगुरुनगर बार असोसिएशनच्या दोन सहका-यांचे मृत्यू झाल्याने न्यायालय परिसरात शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details