पुणे - शहरातील पुलगेट परिसरातील एक खाद्यपदार्थाचे गोडावून आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जाळून भस्मसात झाले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत या गोडाऊनमधील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येतो. या आगीत अंदाजे १५ लाखाच्या खाद्यपदार्थ जळाले आहेत.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कॅन्टोनमेंट परिसरातील एका गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेच या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. एका जुन्या लाकडाच्या घरात हे गोडाऊन होते. त्यात फरसाण, मिठाई यासारख्या पदार्थांचा साठा होता. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी बोलवाव्या लागल्या. गोडाऊन लाकडाचे असल्यामुळे आग अधिकच भडकत होती.