पुणे -राज्यातील शेकडो लोककलावंत, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड काळात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. यासंदर्भात राज्य सरकारने लोककलावंतांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमुळे आनंद झाला असून, लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी प्रतिक्रिया कलावंतांनी व्यक्त केली आहे. तसेत त्यांनी याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक पार पडली. यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून, यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, अशा सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.