आळंदी (पुणे) -अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात चंदन उटीच्या साहाय्याने माऊलींच्या समाधीवरती सावळ्या विठुरायाची मूर्ती रेखाटण्यात आली. तसेच विना मंडपात व समाधी मंदिरात मोगरा व इतर रंगेबिरंगी फुलांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त खास सजवण्यात आले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेदिवशी आळंदीच्या माऊलींच्या गाभाऱ्यात व परिसरात फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळला. प्रत्येक सणानिमित्त माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट केली जाते. मात्र, आज (शुक्रवारी) आकर्षक फुलांमध्ये आणि चंदन उटीमध्ये सावळा विठ्ठल जणू काही आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आळंदीला आला आहे, इतके विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले.