पुणे -सरकारने तातडीने निर्णय घेऊन पूरग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. या महापुरात शेती उद्धवस्त झाली असून, पशुधनाचे मोठे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या पुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करत असून, आमदार आणि खासदार एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देणार असल्याचेही पवार म्हणाले.
पूरग्रस्त भागातील पाणी आटल्यानंतर तेथील ताबडतोब पंचनामे करावेत. आजपर्यंत कधी आला नाही असा महापूर सांगली आणि कोल्हापूरमध्ये आला आहे. पुरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर जमिनीवरील माती वाहून गेली आहे. त्यामुळे कायमस्वरूपीचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.